'अनाथांची माय' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांच काल हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. महिन्या भरापूर्वी त्यांचे हर्नियाचे ऑपरेशन झाले होते. त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, अतिदक्षता विभागात उपचार सुरू असतानाच सिंधुताईंना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. पुण्यातील गॅलक्सी हॉस्पिटलमध्ये वयाच्या 75 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. सचिन तेंडूलकरकडून वात्सल्यसिंधु माईंना श्रद्धांजली अर्पण केली आहे. 'सिंधुताई सपकाळांच्या निधनाची बातमी खूप दुःखदायी आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो' असं ट्वीट केले  आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)