Thane Shocker: ठाण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ठाण्यातील CP Goenka School शाळेबाहेर गुरुवारी विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेचा गैरप्रकार उघडकीस आणला आहे. शाळेच्या सहलीत पहिली आणि तिसरीच्या विद्यार्थिंनींचा विनयभंग झाल्यानंतर शाळा प्रसासनाच्या बाहेर पालकांनी मोर्चा केला आहे. पालक सलग दुसऱ्या दिवशी CP Goenka शाळेबाहेर जमले आहेत. शाळेच्या बाहेर आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. शाळेच्या व्यवस्थापनावर पालकांनी प्रश्न उपस्थित केला आहे. सहलीतून घरी परतल्यानंतर विद्यार्थ्यीनी घटनेची माहिती पालकांना दिली. तक्रारदारांनी सांगितले की, मुलांच्या प्रायव्हेट पार्टला अनेक वेळा हात लावला. या प्रकरणी कापूरबावडी पोलिस ठाण्यात तक्रार केली. संतापलेल्या पालकांनी शाळेबाहेर आंदोलने केले आहे. पोलिसांनी या प्रकरणी व्यवस्थापक जावेद खानला अटक करण्यात आले असून तीन शिक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)