कलाविश्वातून एका निधनाची बातमी समोर येत आहे. स्वरसम्राट प्रल्हाद शिंदेंचे नातू, उत्तम ढोलक वादक सार्थक दिनकर शिंदे यांचे आकस्मित निधन झाले आहे. माहितीनुसार सार्थक शिंदे याचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे अहवालात समोर आले आहे. 31 जुलै त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गायक आणि अभिनेता उत्कर्ष शिंदे याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चुलत भावाला श्रद्धांजली वाहिली आहे. सार्थक शिंदे याचे नांदेड इथे निधन झाले. सार्थक शिंदे यांनी अनेक भीमगीते गायली होती. सार्थक शिंदे यांच्या निधनाच्या बातमीने सर्वत्र मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

(हेही वाचा: Nitin Desai Suicide Case: कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांचा सार्‍या बाजूने तपास होणार - Raigad SP Somnath Gharghe यांची माहिती)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)