सांगलीमध्ये (Sangali) कृष्णा नदीच्या (Krishna River) पात्रात हजारो मासे मृत्यूमुखी पडल्याची घटना काही दिवसांपूर्वी समोर आली होती. कृष्णा नदीच्या पात्रामध्ये हजारो मासे तडफडून मृत झाले असून परिसरातील नागरिक ते मासे पकडण्यासाठी गर्दी करत असल्याचे चित्र यावेळी निर्माण झाले होते.नदीमध्ये मोठ्या प्रमाणात दूषित पाणी मिसळत असल्याने हे मासे मृत झाले असल्याचा आरोप यावेळी स्थानिकांनी केला होता. याप्रकरणी सांगली इथल्या वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना भाडेतत्वावर चालवण्यास दिलेल्या,दत्त इंडिया कंपनीचा साखर कारखाना बंद करण्याचा आदेश महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळानं दिले आहेत. तसेच दत्त इंडियाचा वीज आणि पाणी पुरवठा खंडीत करावा, असे आदेशही दिले आहेत. तसंच वसंतदादा कारखाना चालवत असलेल्या स्वप्नपुर्ती डिस्टिलरीवरही बंदी घालण्यात आली आहे

पहा ट्विट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)