Boycott On Voting: लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सांगली  (Sangli) जिल्ह्यात गावकऱ्यांनी जलसंकटामुळे महत्त्वाची भुमिका घेतली आहे. 7 मे  रोजी निवडणूका येत असताना, गावकऱ्यांनी मतदानाचे निषेध केला आहे. पाणी नाही, मत नाही (No Water, No Vote) अशी भूमिका घेत गावकऱ्यांनी निषेध केला आहे. गावकऱ्यांनी कर्नाटकच्या सीमेजवळ पाण्याच्या समस्यांकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी करत निषेध केला आहे.  जो पर्यंत पाण्याच्या समस्या दूर होत नाही तो पर्यंत मतदान करणार नाही, असा नारा  गावकऱ्यांनी लावला आहे. (हेही वाचा- श्रीकांत शिंदे यांच्याविरूद्ध अभिजित बिचुकले लोकसभा निवडणूकीच्या रिंगणात)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)