हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा राज्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प असून, देशातील सर्वात मोठा महामार्ग असणार आहे. 10 जिल्हे, 26 तालुके व 392 गावांना जोडणाऱ्या या महामार्गाचे काम पर्यावरणाला धोका निर्माण होणार नाही याची दक्षता घेत वेगाने सुरू आहे. महामार्गाच्या परिसरात (कॉरिडोरमध्ये) अपघात टाळण्यासाठी तसेच वन्यप्राण्यांचा थेट प्रवेश रोखण्यासाठी, वन्यजीवनाला आकर्षित करणार्या 13 फळ झाडांच्या प्रजातींची लागवड करण्यात येणार नाही.
हिंदुहृदयसम्राट #बाळासाहेब_ठाकरे #महाराष्ट्र #समृद्धी_महामार्ग राज्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प असून देशातील सर्वात मोठा महामार्ग असणार आहे. १०जिल्हे,२६तालुके व ३९२गावांना जोडणाऱ्या या महामार्गाचे काम पर्यावरणाला धोका निर्माण होणार नाही याची दक्षता घेत वेगाने सुरू आहे. @AUThackeray
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 21, 2021
७०१ किमी लांबीचा व १२० मी. रूंदीचा हा महामार्ग सहापदरी असणार असून गती मर्यादा १५० किमी असल्याने हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर मुंबई नागपूर अंतर फक्त ८ तासांत कापता येणार आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूस एकूण ११ लाख ३१ हजार झाडे लावण्यात आली आहेत.
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 21, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)