Resident Doctors To Go On Idefinite Strike: महाराष्ट्रातील निवासी डॉक्टरांनी गुरुवारी सायंकाळी 5 वाजल्यापासून बेमुदत संपावर जाण्याची घोषणा केली आहे. महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स सेंट्रलचे (MARD) अध्यक्ष डॉ.अभिजीत हेलगे यांनी ही माहिती दिली आहे. या काळात लोकांना आवश्यक वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी आपत्कालीन सेवा सुरू राहतील, असे ते म्हणाले. ते म्हणाले की, राज्यभरातील सुमारे 8000 निवासी डॉक्टर वसतिगृहात उत्तम निवास व्यवस्था, स्टायपेंडमध्ये वाढ आणि थकबाकी मिळण्याच्या मागणीसाठी संपावर जाणार आहेत.
याबाबत निवासी डॉक्टरांनी राज्याच्या आरोग्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. त्यात म्हटले आहे की, 'महाराष्ट्र राज्यातील निवासी डॉक्टरांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्याबाबत प्रशासन गंभीर नसल्यामुळे आम्ही अत्यंत निराश झालो आहोत.' याआधी निवासी डॉक्टर आपल्या मागण्यांसाठी संपावर जाणार होते. मात्र त्यावेळी डॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य करून त्यांनी आपला प्रस्तावित संप मागे घेण्याचे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले होते. आता दोन आठवड्यांनंतरही या मागण्यांवर कार्यवाही सुरु झालेली नाही. (हेही वाचा: Manoj Jarange Patil On Maratha Reservation: मराठा आरक्षण मिळेपर्यंत निवडणुका पुढे ढकला, मनोज जरांगे पाटील यांची मागणी)
Maharashtra Association of Resident Doctors Central (MARD) will go on a statewide indefinite strike from 5 pm tomorrow. Emergency services will remain operational to ensure the provision of essential medical care to the people during the strike. Around 8,000 resident doctors… pic.twitter.com/Ro2jHuIEyF
— ANI (@ANI) February 21, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)