Rajesh Shah Granted Bail: मुंबईतील वरळी कार अपघातातील आरोपी मिहीर शाहचे वडील राजेश शहा यांना जामीन मिळाला आहे. त्यांना 15 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मिळाला आहे. शहा हे शिवसेना नेते असून बीएमडब्ल्यू हिट अँड रन प्रकरणात त्यांना जामीन मिळाला आहे. त्यांचा मुलगा मिहीर शहा याने दुचाकीस्वाराला धडक दिली होती. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी आरोपी मिहिर शाहचे वडील आणि शिवसेना नेते राजेश शहा यांना अटक करण्यात आली आहे. मात्र, नंतर त्यांनी न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. त्यांच्या याचिकेवर सुनावणी घेतल्यानंतर न्यायालयाने त्यांना जामीन देण्याचा निर्णय घेतला. आरोपीच्या वडिलांना आजच न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

बीएमडब्ल्यू हिट-अँड-रन प्रकरणाचा तपास करत असलेल्या मुंबई पोलिसांनुसार, आरोपी मिहिर शाह अपघाताच्या काही तास आधी त्याच्या चार मित्रांसह जुहू येथील एका बारमध्ये गेला होता. त्या ठिकाणी रविवारी रात्री 1 च्या सुमारास त्याने सुमारे 18,730 रुपये खर्च केले. बार सोडल्यानंतर मिहीर त्याच्या मित्रांना सोडण्यासाठी बोरिवलीला गेला होता. त्यावेळी मुंबईतील वरळी येथे रविवारी (7 जुलै) त्याच्या बीएमडब्ल्यू कारने स्कूटरवर जाणाऱ्या जोडप्याला धडक दिली. या अपघातात महिलेला आपला जीव गमवावा लागला.

पहा पोस्ट- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)