लोणावळ्यातील पर्यटन स्थळ असलेलं भुशी धरण हे आज ओव्हरफ्लो झाले. पुणे आणि मुंबई यासह महाराष्ट्राच्या विविध भागांतून पर्यटक हे  भुशी धरणात येत असतात. गेल्या काही दिवसांपासून लोणावळ्यात सतत पाऊस कोसळत असल्यामुळे अखेर भुशी धरण हे ओव्हरफ्लो झाले आहे. इथून पुढे काही दिवस लोणावळ्यातील भुशी धरण, लायन्स पॉईंट आणि टायगर पॉईंट या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. दरवर्षी भुशी धरण भरण्याची पर्यटक वाट पाहत असतात. आज विकेंड असल्याने मोठ्या संख्येने पर्यटकांनी भुशी धरणावर गर्दी केली होती.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)