Pune Video: पुण्यातील पिंपरी चिंचवड येथे एका दुकानदाराने कुत्र्यांच्या पिल्लांना लोखंडी रॉडने मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. १८ एप्रिल रोजी ही घटना घडली आहे. मारहाणीत कुत्र्यांच्या पिल्लांना दुखापत झाली आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कुत्र्यांना मारहाण केल्याप्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केले आहे. या व्हिडिओवर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.व्हिडिओवर अनेकांनी कंमेट केले आहे. पिल्लांना उपचारासाठी वाकड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  (हेही वाचा- लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य शहरात हल्ला करणार असल्याचा केला दावा)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)