पत्नी, सासू आणि मेहुणीच्या छळाला कंटाळून विश्रांतवाडी परिसरात एका व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पत्नी, सासू आणि मेहुणीविरुद्ध गुन्हा दाखल केला. प्रफुल्ल हरिश्चंद्र कदम (वय 32, रा. सत्यम राजा योग सोसायटी, धानोरी, विश्रांतवाडी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. या संदर्भात कदम यांचे वडील हरिश्चंद्र गोविंद कदम (वय 60) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चिंचवडच्या छत्रपती संभाजीनगर परिसरात प्रफुल्लची सासू राहते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नानंतर पत्नी, सासू यांनी प्रफुल्लचा छळ सुरू केला. या छळाला कंटाळून प्रफुल्लने 31 डिसेंबर रोजी धानोरी येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी प्रफुल्लने चिठ्ठी लिहिली होती. याबाबत पुढील तपास सुरू आहे. (हेही वाचा: Pune WNS Employee Murder: पुण्यातील बीपीओ कंपनीत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याची पुरुष सहकाऱ्याने केली हत्या)

पुण्यात पत्नीच्या कथित छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)