![](https://mrst1.latestly.com/uploads/images/2024/10/murder-5-380x214.jpg?width=380&height=214)
Pune WNS Employee Murder: पुण्यातील बिझनेस प्रोसेस आऊटसोर्सिंग (बीपीओ) कंपनीत काम करणाऱ्या २८ वर्षीय महिलेची तिच्या सोबत काम करणाऱ्या पुरुष सहकाऱ्याने धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी उघडकीस आली आहे. पोलिसांनी ही माहिती दिली. शहरातील येरवडा परिसरातील डब्ल्यूएनएस कंपनीच्या पार्किंगमध्ये हा हल्ला झाला आहे. शुभदा कोडारे असे मृत महिलेचे नाव असून आरोपी कृष्णा कनोजा कंपनीच्या लेखा विभागात कामाला होती. प्राथमिक माहितीनुसार, संशयिताने सायंकाळी सहाच्या सुमारास कंपनीच्या पार्किंगमध्ये कोडारे यांच्या उजव्या कोपरावर धारदार शस्त्राने हल्ला केला आहे. पैसे उधार घेण्याच्या वादातून हा हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. हेही वाचा: Lim Kimya Shot Dead: कंबोडियाचे विरोधी पक्षनेते लिम किम्या यांची बँकॉक येथे गोळ्या घालून हत्या
शुभदा कोडारे असे मृत महिलेचे नाव असून आरोपी कृष्णा कनोजा कंपनीच्या लेखा विभागात कामाला होती. प्राथमिक माहितीनुसार, संशयिताने सायंकाळी सहाच्या सुमारास कंपनीच्या पार्किंगमध्ये कोडारे यांच्या उजव्या कोपरावर धारदार शस्त्राने हल्ला केला. पैसे उधार घेण्याच्या वादातून हा हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे.