Pune Violent Attack: पुण्यातील मोहम्मदवाडी येथील गंगा फ्लोरेंटिना सोसायटीच्या बाहेर किरकोळ कारणावरून वीस तरुणांच्या टोळक्याने दोन व्यक्तींवर हिंसक हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना रात्री 12 च्या सुमारास घडली. या घटनेनंतर जनतेला उपद्रव देणाऱ्या लोकांना कायद्याचा धाक नसल्याबद्दल नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. कोंढवा पोलीस ठाण्याच्या मान्यतेने पहाटे चार वाजेपर्यंत सुरू असलेले दोन कॅफे लवकरात लवकर बंद करण्याची मागणी करत परिसरातील नागरिकांनी आवाज उठवला आहे. रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, या कॅफेमध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीचे, तसेच ड्रग्ज व्यसनी लोक येतात, जे महिला, मुले आणि इतर स्थानिकांसाठी समस्या निर्माण करतात. रहिवाशांनी या लोकांविरुद्ध एफआयआर दाखल करण्याचा आग्रह धरला असून, गंगा फ्लोरेंटिना सोसायटीच्या मुख्य गेटसमोरील भागात वारंवार येणाऱ्या कट्टर गुन्हेगारांना पकडण्यासाठी रात्रीची गस्त घालण्याचीही विनंती केली आहे. (हेही वाचा: Junnar Leopard Attack: जुन्नरमध्ये अंगणात खेळणाऱ्या चिमुकल्याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू)

पहा व्हिडिओ- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)