Junnar Leopard Attack: जुन्नरमध्ये अंगणात खेळणाऱ्या चिमुकल्याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू
Leopard प्रतिकात्मक प्रतिमा (PC - Wikimedia commons)

पुणे जिल्ह्यातील जुन्नरमध्ये अंगणात खेळत असलेल्या चिमुकल्यावर बिबट्याने हल्ला केला आहे. यामध्ये चिमुकल्याचा मृत्यू झालाय. जुन्नर तालुक्यात पुन्हा एक चिमुकला बिबट्याचा शिकार (Leopard Attack) बनला आहे. बिबट्याच्या हल्ल्यात 8 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. बिबट्याच्या हल्ल्याची दिड महिन्यातील ही तिसरी घटना आहे. बिबट्याच्या हल्ल्यामुळे जुन्नरमधील ग्रामस्थांमध्ये आता दहशतीचं वातावरण आहे. जुन्नर तालुक्यातील काळवाडी येथे ही घडली घटना घडली आहे. रुद्र महेश फापाळे, असं या चिमुकल्याचं नाव (Leopard Attack In Junnar) आहे. रूद्र यात्रेसाठी गावी आला होता. (हेही वाचा - Boy Died After Eating Shawarma: चिकन शॉरमा खाल्ल्याने 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू, अनेकांना विषबाधा; मानखुर्द परिसरातील घटना)

रूद्र घरासमोरील अंगणात खेळत होता. याचवेळेस एक बिबट्या आडोशाला दबा धरून बसला होता. याची कल्पना रूद्रला नव्हती. दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक रूद्रवर हल्ला केला. यावेळी बिबट्याने पुन्हा एका चिमुकल्याची शिकार केली आहे. या घटनेनंतर मात्र आथा काळवाडीतील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. जुन्नरमधील दीड महिन्यातील बिबट्याच्या हल्ल्याची तिसरी घटना आहे.

11 एप्रिल रोजी जुन्नरमधील शिरोली खुर्द गावात बिबट्याने एका चिमुकलीवर हल्ला केल्याची घटना घडली होती. या घटनेत संस्कृती कुळेकर नावाच्या चिमुकलीचा मृत्यू झाला होता. शेतीपासून काही अंतरावर या चिमुकलीचा मृतदेह आढळून आला होता. या घटनांमुळे जुन्नरमधील ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट आहे. बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.