पुण्यात आज कोरोनामुळे एकही मृत्यू झाल्याची नोंद झालेली नाही, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. दरम्यान, शहरातील रुग्णसंख्या घटत असून मृत्यूसंख्याही कमी होणे हे अत्यंत दिलासादायक आहे. तसंच हे यश पुणेकरांच्या सामुहिक प्रयत्नांनी प्राप्त होत असल्याचे मोहोळ यांनी म्हटले आहे.
पहा ट्विट:
पुणे शहरात आजही 'शून्य' कोरोनाबाधित मृत्यू !
पुणे महापालिका हद्दीत कोरोनाबाधित रुग्णांचे दगावण्याचे प्रमाण आणखी घटले असून आजही कोरोनाबाधित मृत्यूसंख्येची नोंद नाही. रुग्णसंख्या घटत असताना मृत्यू संख्याही कमी होणे, हा मोठा दिलासा पुणेकरांना सामूहिक प्रयत्नांनी मिळत आहे.
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) October 29, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)