Pune Rain Video: महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत उन्हाची काहिली वाढली होती, मात्र आता  राज्याच्या काही भागात पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. विदर्भ, मराठवाड्यात सलग पाच दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत आहे. आता पुणे शहरात आज मुसळधार पावसाला सुरुवात झाली. यंदाच्या पहिल्या पावसाने पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या काही भागांना चांगलेच झोडपले, यामुळे नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला. आज सायंकाळी साडेपाच वाजल्यापासून पाऊस पडण्यास सुरुवात झाली. पुणे शहरातील डेक्कन, कोथरूड, वारजे, माळवाडी, स्वारगेट, हडपसर, कोंढवा आणि इतर भागांत जोरदार पाऊस झाला. भारतीय हवामान खात्याने आज पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज व्यक्त केला होता. (हेही वाचा: Monsoon Update: भारतात यंदा सरासरीपेक्षा अधिक 106% पर्जन्यवृष्टीची शक्यता; कसा असेल महाराष्ट्रातील पाऊस? घ्या जाणून)

पहा व्हिडिओ-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)