Monsoon Rains in 2024: भारतात यंदाच्या वर्षी पर्जन्यमान सामान्य पातळीपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. यंदाच्या वर्षी देशात 87 सेंटीमीटरच्या दीर्घ-काळाच्या सरासरीच्या 106% असा एकूण पाऊस पडेल. ऑगस्ट-सप्टेंबरपर्यंत ला निना (La Nina) परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने नुकताच हवामानाचा अंदाज आणि मान्सून 2024 संदर्भात भाकीत केले. या वेळ यंदाच्या पर्जन्यमानाबद्दल भाष्य करण्यात आले. दरम्यान, हवामान विभागाच्या शास्त्रज्ञांनी म्हटले की, एका बाजूला पावसाळ्याच्या दिवसांची संख्या कमी होत आहे तर मुसळधार पावसाच्या घटना (थोड्या कालावधीत जास्त पाऊस) वाढत आहेत. त्यामुळे वारंवार दुष्काळ आणि पूर येतो.
भारतीय हवामान विभागाचे प्रमुख मृत्युंजय महापात्रा यांनी म्हटले की, भारताने मान्सूनच्या हंगामात नऊ प्रसंगी सामान्यपेक्षा जास्त पाऊस अनुभवला जेव्हा ला निना नंतर एल निनो आले. 1951-2023 दरम्यानच्या आकडेवारीचा आधार देत महापात्रा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, भारतामध्ये चार महिन्यांच्या मान्सून हंगामात (जून ते सप्टेंबर) सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. हा पाऊस आणि दीर्घ कालावधीच्या सरासरीच्या (87 सेमी) 106 टक्के असा एकत्रित पडेल, असेही ते म्हणाले.
महापात्रा पुढे बोलताना म्हणाले, हिंद महासागरातील द्विध्रुवीय स्थितीचा अंदाज पावसाळ्यात सकारात्मक आहे. तसेच, उत्तर गोलार्धात बर्फाचे आवरण कमी आहे. ही परिस्थिती भारतीय नैऋत्य मान्सूनसाठी अनुकूल असल्याचे ते म्हणाले. सध्या मध्यम एल निनोची स्थिती आहे. मान्सूनचा हंगाम सुरू होईपर्यंत तो स्थिर होण्याचा अंदाज आहे. त्यानंतर मॉडेल सुचवतात, ऑगस्ट-सप्टेंबरपर्यंत ला लिना परिस्थिती तयार होऊ शकते, असे मोहपात्रा म्हणाले. पहिला एल निनो, दुसरा हिंद महासागर द्विध्रुव (IOD), जो विषुववृत्तीय हिंद महासागराच्या पश्चिम आणि पूर्व बाजूंच्या भिन्न तापमानवाढीमुळे उद्भवतो. तिसरा म्हणजे उत्तर हिमालय आणि युरेशियन भूभागावरील बर्फाचे आवरण. ज्याचा भारतीय मान्सूनवर लँडमासच्या विभेदक हीटिंगद्वारे प्रभाव पडतो, असेही ते म्हणाले.
भारत हा कृषीप्रधान देश आहे. या देशातील 50% हून अधिक जनात ही शेतीवर अवलंबून असते. या देशातील नागरिकांचा शेती हाच प्रमुख व्यवसाय आहे. ही शेती सर्वस्वी पावसावरच अवलंबून असते. परिणामी पावसाकडे भारतीयांचे लक्ष नेहमीच लागून राहिलेले असते. त्यातही भारतामध्ये मान्सून हा पावसाचा महत्त्वाचा स्त्रोत मानला जातो. त्यामुळे मान्सूनबाबत घडणाऱ्या घटनांमध्ये भारतीय अधिक सजग असतात.