पुणे शहराला सध्या पावसाने चांगलंच झोडपून काढलं आहे. धरणं देखील पूर्ण क्षमतेने वाहू लागल्याने पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. अशावेळी नदीपात्रातील लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत केले जात आहे. अनेक ठिकाणी लोकांच्या घरात पाणी शिरले आहे. त्यामुळे अशा नागरिकांच्या मदतीसाठी प्रशासन यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. खडकवासला धरणात देखील पाण्याचा विसर्ग वाढवला असल्याने नदीपात्राच्या शेजारील नागरिकांना दक्ष राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच आज शाळांनाही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. नक्की वाचा: Schools Closed in Pune: मुसळधार पाऊस, शाळांना सुट्टी; पुणे जिल्ह्याला पावसाने झोडपले, नागरी वस्तीत पाणी; जाणून घ्या हवामान अंदाज .

पुण्यामध्ये लोकांच्या घरात पाणी

वाहतूक मंदावली

मूळा मूठा नदी धोक्याच्या पातळीवर

खडकवासला मधून पाण्याचा विसर्ग वाढला

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)