Heavy Rain Pune | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

पुणे शहर आणि आसपासच्या घाट परिसरात येत्या काही तासांत मुसळधार पावसाचा इशारा हवामान अंदाज (Weather Forecast) व्यक्त करताना आयएमडीने (IMD) दिला आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून 25 जुलै रोजी खडकवासला, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यांसह पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडसह अनेक भागातील शाळा बंद (Schools Closed in Pune) ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. जिल्हाधिकारी आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष सुहास दिवसे यांनी हे आदेश दिले. प्रशासनाने दिलेल्या अधिकृत निवेदनानुसार, आज (25 जुलै) पहाटे खडकवासला धरमातून सुमारे 40,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला. परिणामी धरणाखालील भागात जनजीवन विस्कळीत झाले.

पुणे जिल्ह्यासाठी रेड अलर्ट

पुणे आणि परिसरात रात्रभर मुसळधार पाऊस सुरू आहे. पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) ने 25 जुलै रोजी पुण्यात मुसळधार पावसासह सामान्यतः ढगाळ आकाशाचा हवामान अंदाज वर्तवला आहे आणि या प्रदेशात अत्यंत मुसळधार पावसासाठी 'रेड' अलर्ट जारी केला आहे. हा इशारा अपेक्षित मुसळधार पावसाच्या महत्त्वपूर्ण प्रभावांचा उच्च धोका दर्शवितो. (हेही वाचा, Pune Rains: खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू; नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला)

खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू

जिल्हा प्रशासाने दिलेल्या अधिकृत निवेदनानुसार, खडकवासला धरणातून सकाळी 6 वाजल्यापासून सुमारे 40 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तसेच पुणे शहरातील सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी दिवसे यांनी केले आहे. गरज असेल तरच घराबाहेर पडा,” असे अधिकृत प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

एक्स पोस्ट

पुणे जिल्हा हवामान अंदाज:

26 जुलै: मध्यम स्वरूपाच्या पावसासह ढगाळ वातावरण. तापमान 23°C ते 27°C पर्यंत असेल.

27 जुलै: सतत ढगाळ आकाश मध्यम पावसासह. 23°C आणि 27°C दरम्यान तापमान.

28 जुलै: कमाल 28°C आणि किमान 22°C सह किंचित गरम. मध्यम पाऊस अपेक्षित आहे.

29 जुलै: 22°C ते 29°C पर्यंत तापमानासह सतत पाऊस.

जुलै 30: 23°C आणि 28°C दरम्यान तापमानासह पावसाळी स्थिती कायम.

रहिवाशांना आठवडाभर ओले हवामान आणि संभाव्य व्यत्ययांसाठी तयार राहण्याचा सल्ला दिला जातो. या काळात सर्वांनी सावध राहण्याचे आणि अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे.

एक्स पोस्ट

अनेक रहिवाशांनी सोशल मीडियावर मुसळधार पावसामुळे पाणी साचल्याचे व्हिज्युअल शेअर केले आहेत, त्यात लक्षणीय व्यत्ययांवर प्रकाश टाकला आहे. अनेक तास मुसळधार पाऊस सुरू असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली. नागरिकांच्या घरात पाणी शिरले असून अनेकांचे संसार पाण्याखाली गेले आहेत. खास करुन पुणे शहरातील डेक्कण परिसर, भिडे पूल परिसरातील अनेक ठिकाणी पाणी नागरी वस्तीत घुसले आहे. पुणे आणि परिसरात रात्रभर मुसळधार पाऊस पडत आहे. पाणलोट क्षेत्रातील मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला आहे. पाण्याच्या वाढत्या विसर्गासोबत नागरिकांच्या चिंतेतही भर पडली आहे.