पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते नाशिक आणि मुंबईतील विविध विकासकामांचे उद्घाटन करतील. सुरुवातीला ते नाशिक येथे पोहोचले आहेत. नाशिक येथे ते रोड शोमध्ये सहभागी झाले आहेत. नाशिक येथील कार्यक्रम आटोपल्यावर ते मुंबईसाठी रवाना होतील. मुंबई येथे त्याच्या हस्ते शिवडी-नाव्हा शेवा सागरी सेतूचे लोकार्पण करणार आहेत. तत्पूर्वी त्यांनी नाशिक येथे रोड शो केला.

व्हिडिओ मध्ये आपण पाहू शकता पंतप्रधान नरेंद्र मदी यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस उपस्थित आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेकर बावनकुळे हे देखील आपणास दिसून येतात. (हेही वाचा, Mumbai Trans Harbour Link Inauguration Today: मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उद्घाटन, जाणून घ्या संपूर्ण महाराष्ट्र दौऱ्याविषयी)

व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)