Deep Pothole On Samruddhi Highway Bridge: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेला समृद्धी महामार्ग (Samruddhi Mahamarg) दीड वर्षांपूर्वी लोकांसाठी खुला करण्यात आला. तेव्हापासून तो अपघातांमुळे नेहमीच चर्चेत आहे. अमरावती (Amravati) येथील नांदगाव-खंडेश्वर तालुक्यातील लोहेगाव (Lohegaon) येथील महामार्गावरील पुलावर आता खड्डे पडले आहेत. त्यामुळे बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काही शेतकरी पुलावरून जात असताना त्यांना पुलावर खोल खड्डे पडलेले दिसले. त्यांनी प्रशासनाला यासंदर्भात सतर्क केले. त्यानंतर बॅरिकेड्स उभारून वाहतूक अन्य लेनने हलविण्यात आली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. शिवाय निकृष्ट कामावरून विरोधी पक्षांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे. (वाचा - Pune to Sambhaji Nagar Expressway: आता पुण्यावरून संभाजीनगर अवघ्या 2 तासांत, तर नागपुर 4.5 तासांत; नव्या 225 किमीच्या एक्स्प्रेस वेला केंद्रीय मंत्रालयाचा ग्रीन सिग्नल)

पहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)