Shirpur Shocker:  राज्यात सध्या विधानसभा निवडणूकांसाठी मतदान होत आहे. निवडणूक काळात पोलीस प्रशासनाकडून वाहनांची कसून तपासनी केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर आज पहाट 5 वाजता शिरपूर (Shirpur) तालुक्यातील थाळनेर गावात पोलिसांनी कंटेनरची झडती घेतली. त्या दरम्यान, 94.68 कोटी रुपये किमतीचे 10,000 किलो चांदीच्या विटा (Silver Ingots) मिळाल्या आहेत. कंटेनरमध्ये आढळलेला सर्व मुद्देमाल एचडीएफसी बँकेशी (HDFC Bank) निगडीत असल्याचे सांगितले जात आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. (Voting Disrupted in Washim: वाशिममधील मतदान केंद्र 250 वर तासभरापासून मतदान विस्कळीत, नागरिकांचा खोळंबा (Watch Video))

 

 94.68 कोटींच्या 10 हजार किलो चांदीच्या विटा आढळल्या

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)