Mumbai Local Train Update:  मुंबई करांसाठी लोकल संदर्भात महत्त्वाची बातमी समोर आली आहे. गुरुवारी सकाळी पश्चिम मार्गावर सेवा विस्कळीत झाली आहे. बोरिवली स्टेशनच्या ट्रॅकवर 'पॉइंट फेल्युअर'मुळे म्हणजे काही तांत्रिक बिघाडामुळे लोकल सेवा काही वेळ ठप्प झाली आहे.त्यामुळे येणाऱ्या पुढील ट्रेनमध्ये प्रवाशांची गर्दी वाढलेली पाहायला मिळाली आहे. पश्चिम रेल्वेच्या (डब्ल्यूआर) प्रवक्त्याने सांगितले की, “पॉइंट फेल्युअर'मुळे लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वे या दहा ते पंधरा मिनीटे उशीराने धावणार आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)