Salil Deshmukh Bail: अनिल देशमुख यांचा मुलगा सलील देशमुखांना पीएमएलए न्यायालयाकडून जामीन मंजूर
अनिल देशमुखांचा मुलगा सलील देशमुख यांना दिलासा देणारी बातमी आहे. पीएमएलए न्यायालयाकडून सलील देशमुख यांचा जामीन मंजूर करण्यात आला आहे.
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) कथित 100 कोटींच्या घोटाळ्या प्रकरणी गेले 11 महिन्यांपासून अटकेत आहेत. पण अनिल देशमुखांचा मुलगा सलील देशमुख (Salil Deshmukh) यांना दिलासा देणारी बातमी आहे. पीएमएलए न्यायालयाकडून सलील देशमुख यांचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. तर 3 लाख रुपयांच्या जामीन जातमुचलक्यासह काही अटींवर सलील देशमुख यांना हा जामीन देण्यात आला आहे. तरी परवानगी शिवाय सलील देशमुखांना देश सोडता येणार नाही, असं पीएमएलए न्यायालयाकडून सांगण्यात आलं आहे.
Money laundering case | Special PMLA Court grants bail to Maharashtra's former Home minister's son Salil Deshmukh. The bail has been given on certain conditions including a bail bond of Rs 3 lakhs and that he cannot leave the country without permission.
— ANI (@ANI) November 1, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 01, 2022 08:25 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

