PM Modi Tried His Hand at Nangara: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, शनिवारी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. यावेळी ते कोट्यावधी रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन व पायाभरणी करणार आहेत. मोदींनी महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात वाशीम येथून केली. त्यांनी पोहरादेवी येथील जगदंबा माता मंदिरात प्रार्थना केली आणि पारंपारिक ढोल वाजवला. वाशिममध्ये पंतप्रधान पारंपरिक ढोल वाजवतानाचा व्हिडिओही समोर आला आहे. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही उपस्थित होते. हा व्हिडीओ शेअर करताना पीएम मोदी म्हणतात, ‘वाशिममध्ये बंजारा संस्कृतीत विशेष स्थान असलेल्या नांगरावर (ढोल) माझा हात आजमावला. आगामी काळात ही संस्कृती अधिक लोकप्रिय करण्यासाठी आमचे सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल.’

यानंतर त्यांनी संत सेवालाल महाराज व संत रामराव महाराज यांच्या समाधीला पुष्पहार अर्पण केला. नंतर पंतप्रधान मोदींनी वाशिममधील बंजारा हेरिटेज म्युझियमचे उद्घाटन केले. त्यानंतर एका कार्यक्रमात पीएम-किसान सन्मान निधीचा 18वा हप्ता जारी करण्यात आला. पंतप्रधानांनी वाशिममध्ये सुमारे 23,300 कोटी रुपयांच्या कृषी आणि पशुसंवर्धन क्षेत्राशी संबंधित योजनांचा शुभारंभ केला. (हेही वाचा: PM Narendra Modi: नवरात्रीनिमित्त PM मोदी 9 दिवस ठेवणार उपवास, देशवासियांना दिल्या नवरात्रीच्या खास शुभेच्छा, पाहा पोस्ट)

वाशिममध्ये पंतप्रधान मोदींनी वाजवला पारंपारिक ढोल-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)