PM Modi Swagat In Nashik: आज मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचा अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूचा उद्घाटन पंतप्राधन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर यंदा 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजनाची जबाबदारी महाराष्ट्रावर सोपवण्यात आली असून या महोत्सवाचे जय्यत तयारी होत आहे. नाशिकमध्ये या महोत्सवाचे आयोजन होणार असल्याने गेल्या काही दिवसांपासून तयारी सुरु आहे. महत्त्वाचे म्हणजे आज नाशिकच्या तपोवन येथील मोदी मैदानावर राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन  पंतप्रधन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. खास आकर्षण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोंदी शहरात दाकल होताच, नाशिकमध्ये मोठा रोड शो देखीह होणार आहे. त्यामुळे फक्त शहरात नव्हे तर राज्यातील प्रत्येकाचे लक्ष रोड शोवर आहे. रोड शो नाशिक- छत्रपती संभाजी नगर महामार्गावरील मिरची सर्कलपासून ते जनार्दन स्वामी मठ चौका पर्यंत होईल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)