होळीच्या सणानिमित्त प्रवाशांची प्लॅटफॉर्म वरील गर्दी नियंत्रित ठेवण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकीटांच्या विक्रीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. मध्य रेल्वेकडून गर्दीच्या व्यवस्थापनासाठी 8 मार्च ते 16 मार्च दरम्यान प्लॅटफॉर्म तिकिटांची विक्री होणार नसल्याचं म्हटलं आहे. ही विक्री सीएसएमटी, ठाणे, दादर, पनवेल, कल्याण, एलटीटी स्थानकावर लागू असणार आहे. या नियमामधून आजारी व्यक्ती, लहान मुलं यांच्यासोबत आलेल्यांना शिथिलता दिली जाईल. Holi Special Trains on Central Line: मध्य रेल्वे कडून नागपूर, मडगाव, नांदेड आणि पुणे साठी स्पेशल ट्रेन्स जारी; पहा वेळापत्रक .
मध्य रेल्वेकडून प्लॅटफॉर्म तिकीटांवर निर्बंध
प्रवाशांनी कृपया लक्ष द्यावे: येणाऱ्या होळी सणामुळे प्लॅटफॉर्म होणार्या अतिरिक्त गर्दी लक्षात घेउन अप्रिय घटना टाळण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकिटांची विक्री दिनांक ०८.०३.२०२५ ते १६.०३.२०२५ पर्यंत प्रतिबंधित करण्यात आली आहे.@Central_Railway @YatriRailways pic.twitter.com/WJhyZCZSFi
— DRM Mumbai CR (@drmmumbaicr) March 7, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)