बंडखोर आमदारांच्या बैठकीत उपसभापती Narhari Zirwal यांची हकालपट्टी करण्याचा ठराव घेण्याचे नियोजन

विधानसभा अध्यक्षाची निवड न झाल्याने उपसभापतींची भूमिका वाढली आहे.

बंडखोर आमदारांच्या बैठकीत उपसभापती Narhari Zirwal यांची हकालपट्टी करण्याचा ठराव घेण्याचे नियोजन
Narhari Zirwal (संग्रहित संपादित प्रतिमा)

शिवसेनेने गटनेते पदावरू एकनाथ शिंदे यांची हकालपट्टी करून त्यांच्या जागी अजय चौधरी आणि मुख्य प्रतोद म्हणून सुनील प्रभू यांची नियुक्ती केली होती. सेनेचा हा निर्णय शिंदे गटासाठी पहिला धक्का होता. शिंदे गटाकडून या निर्णयाचा पूर्णतः विरोध झाला, परंतु आता शिवसेनेने केलेल्या नियुक्तीला विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी शुक्रवारी मान्यता दिली. त्यानंतर आज शिंदे गटातील आमदारांची एक महत्वाची बैठक पार पडली. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या बैठकीत उपसभापती नरहरी झिरवाळ यांची हकालपट्टी करण्याचा ठराव घेण्याचे नियोजन केले आहे. बंडखोर गटातील 46 आमदारांच्या सह्या घेऊन प्रस्तावाच्या तयारीसाठी कार्यवाही सुरू केली जाणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. याबाबत एएनआयने वृत्त दिले आहे.

विधानसभा अध्यक्षाची निवड न झाल्याने उपसभापतींची भूमिका वाढली आहे. अशा परिस्थितीत उपसभापती नरहरी झिरवाळ हे संकटात सापडलेल्या सरकारला वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 24, 2022 10:19 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).