महाराष्ट्रात 4 मार्च ते 20 मार्च दरम्यान झालेल्या गारपीट, पावसामुळे फळबागांचे झालेल्या नुकसानाचे बहुतांश जिल्ह्यातले पंचनामे पूर्ण झाल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन विभागाकडून देण्यात आली आहे. यामध्ये कडधान्यं, फळभाज्या, भाजीपाला, गहू, हरभरा, कांदा, द्राक्ष, स्ट्रॉबेरी, संत्री, मका इत्यादी पिकांचे नुकसान झाले आहे. निधी मागणीसाठी जिल्हानिहाय प्रस्ताव तयार करण्यात आले असून, तत्काळ निधी वितरणाला मंजुरी दिली जाईल असेही विभागानं कळवलं आहे.
पहा ट्वीट
राज्यात 4 मार्च ते 20 मार्च दरम्यान झालेल्या गारपीट आणि पावसामुळे शेती आणि फळबागांच्या झालेल्या नुकसानाचे बहुतांश जिल्ह्यातले पंचनामे पूर्ण झाले आहेत. सुमारे २ लाख हेक्टर क्षेत्रावरील पंचनामे पूर्ण झाल्याची माहिती राज्याच्या मदत आणि पुनर्वसन विभागानं दिली आहे. @MahaDGIPR
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) April 5, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)