बारामती अ‍ॅग्रो कंपनीमध्ये आर्थिक घोटाळ्याचे आरोप असलेल्या रोहित पवारांची आज मुंबई ईडीमध्ये चौकशी होत आहे. ईडी चौकशीला सामोरे जाण्यापूर्वी त्यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचे आशीर्वाद घेतले आहेत. सुप्रिया सुळे रोहित पवार यांना ईडी कार्यालयाच्या दारापर्यंत सोडायला गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी रोहित पवारांना संविधानाची प्रत दिली आहे ती घेऊन  ते आत गेले आहेत. दरम्यान सुप्रिया  सुळे यांनी ईडी कार्यालयाजवळ मीडीयाशी बोलताना 'आव्हानांवर मात करून आम्ही बाहेर पडू' अशी प्रतिक्रिया दिली आहे. नक्की वाचा: Rohit Pawar On ED Inquiry: 'जर दबाव टाकण्यासाठी हे केलं जात असेल तर त्यांनी चूकीची व्यक्ती निवडली' - रोहित पवार .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)