बारामती अ‍ॅग्रो  प्रकरणात रोहित पवारांना (Rohit Pawar) समन्स दिल्यानंतर आज रोहित पवार मुंबई मध्ये ईडी कार्यालयात दाखल होण्यास सज्ज झाले आहेत. 11 वाजता ईडी कार्यालयात जाण्यापूर्वी त्यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची पक्ष कार्यालयात भेट घेतली आहे. तत्पूर्वी मीडीयाशी बोलताना त्यांनी या कारवाईमागे कोण आहे हे सांगू शकत नाही पण हा प्रकार जर दबाव टाकण्यासाठी केला जात असेल तर त्यांनी चूकीची व्यक्ती निवडली आहे असे ते म्हणाले आहेत. दरम्यान आज रोहित पवारांच्या समर्थनार्थ अनेक कार्यकर्ते घोषणाबाजी करत आहेत. Rohit Pawar ED Inquiry: शरद पवार, सुप्रिया सुळेंचे आशिर्वाद, हाती संविधान घेऊन रोहित पवार पोहचले मुंबई ईडी कार्यालयात! (Watch Video) .

रोहित पवार यांची प्रतिक्रिया

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)