मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज निर्माणाधीन नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची हवाई पाहणी केली. त्यानंतर त्यांनी ,अध्यामांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी साधारण डिसेंबर 2024 पर्यंत या विमानतळावरून पहिल्या विमानाचे उड्डाण होईल असे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्तेच या विमानतळाचे उद्घाटन व्हावे यासाठी युद्धपातळीवर विमानतळाचे काम पूर्ण करण्याचा राज्य सरकारचा मानस असल्याचेही मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितले. या नव्या विमानतळाच्या कामाबतात मुख्यमंत्री शिंदे यांनी समाधान व्यक्त केले. (हेही वाचा: Thane: प्रवाशांना दिलासा! तब्बल 6 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर 10 जूनपर्यंत पूर्ण होणार ठाण्यातील गांधीनगर पूल)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)