महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (MSEDCL) च्या अधिकाऱ्याला नागपुरातून अटक करण्यात आली आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी याबाबत माहिती दिली आहे. शहरातील रेशीमबाग परिसरातील डॉ हेडगेवार स्मारकाजवळील सभागृहाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडमधील उपकार्यकारी अभियंत्यावर करण्यात आला आहे. याप्रकरणी त्याला गुरुवारी अटक करण्यात आली. अतिरिक्त पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी म्हणाले की, आरोपी अधिकाऱ्याने गेल्या आठवड्यात सक्करदरा पोलीस स्टेशनला पत्र पाठवले होते, ज्यामध्ये त्याने सभागृहात बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी दिली होती. सभागृहातील महावितरणचा आधीच नियोजित कार्यक्रम थांबवण्याचा यामागचा हेतू असल्याचे चौकशीत उघड झाले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)