मुंबई शहरातील पाणीपुरवठ्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईत गुरुवार आणि शुक्रवारी, म्हणजेच 2 आणि 3 मार्च रोजी दुरुस्तीच्या कामामुळे एस आणि एन वॉर्डातील काही ठिकाणचा पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे. त्यामुळे विभागातील नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

गुरुवार आणि शुक्रवारी पाणीकपातमुळे मुंबईमधील लाल बहादूर शास्त्री मार्ग, घाटकोपर (पश्चिम), रमाबाई आंबेडकर नगर, शास्त्री नगर, सुभाष नगर, आंबेवाडी, सर्वोदय नगर आदी भागातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. या काळात परिसरातील रहिवाशांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन मुंबई पालिकेने केले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)