मुंबईमध्ये 20 नोव्हेंबर 2023 ते 2 डिसेंबर 2023 या कालावधीत 10 टक्के पाणी कपात होणार आहे. मुंबई महानगरपालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील पिसे येथील न्यूमॅटिक गेट सिस्टीममधील एअर ब्लॅडर बदलण्याचे काम, सोमवार, 20 नोव्हेंबर 2023 ते 2 डिसेंबर 2023 हाती घेण्याचे ठरविले आहे. सदर तातडीच्या दुरुस्ती कामामुळे मुंबईमधील पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. सोमवार 20 नोव्हेंबर 2023 ते 2 डिसेंबर 2023 या कालावधीत मुंबई शहर व उपनगर तसेच बीएमसी तर्फे ठाणे व भिवंडी महानगरपालिकेस होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर 10 टक्के कपात केली जाणार आहे. मुंबई शहर आणि उपनगरातील एकूण 24 विभागांतील नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे. (हेही वाचा: कोणत्याही वैद्यकीय मदतीशिवाय महिलेने मुंबई लोकल ट्रेनमध्ये दिला बाळाला जन्म; सोशल मिडियावर व्हिडिओ व्हायरल)
२० नोव्हेंबर २०२३ ते २ डिसेंबर २०२३ या कालावधीत मुंबईत १० टक्के पाणी कपात
---
10 % water cut in Mumbai from 20 November 2023 to 2 December 2023#BMC#BMCUpdates#watersupply@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@dvkesarkar@MPLodha@IqbalSinghChah2 pic.twitter.com/xFBfLmlT7t
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) November 16, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)