काल अनंत चतुर्दशीच्या धामधुमीनंतर आज मुंबई मध्ये Eid-e-milad च्या निमित्ताने अनेक ठिकाणी जुलूस निघणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत काही भागांमध्ये वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. आज 29 सप्टेंबरच्या दुपारी 2 वाजल्यापासून वाहतूकीमधील हे बदल लागू केले जाणार आहेत. ईद-ए-मिलाद निमित्त निघणाऱ्या मिरवणुकीमध्ये गर्दी होण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांना होणारी गैरसोय टाळण्यासाठी हे बदल केले असल्याची माहिती ट्राफिक विभागाकडून देण्यात आली आहे.
पहा ट्वीट
दिनांक २९-०९-२०२३ रोजी मुंबई शहरात ईद-ए-मिलाद निमित्त निघणाऱ्या मिरवणुकीमध्ये गर्दी होण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांना होणारी गैरसोय टाळण्यासाठी २९ सप्टेंबर रोजी १४:०० वा. पासून वाहतूक व्यवस्थेत खालीलप्रमाणे बदल करण्यात आले आहेत. #वाहतूक_नियोजन pic.twitter.com/ymdi5boR8L
— Mumbai Traffic Police (@MTPHereToHelp) September 29, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)