मुंबई वाहतूक पोलिसांनी कायदा मोडणाऱ्या दुचाकीस्वारांकडून 10,215 रुपयांपेक्षाही अधिक दंड वसूल केला आहे. यात हेल्मेट न वापरणे, मद्यपान करुन वाहन चालवणे यांबद्दल कारवाई करुन हा दंड वसूल करण्यात आला आहे. दरम्यान, कारवाई करण्यात आलेल्या एकूण 73 वाहनचालकांपैकी 65 दुचाकी वापरणारे होते, असे अधिकाऱ्याने मंगळवारी सांगितले.

संपूर्ण शहरामध्ये, ट्रिपल सीट चालवल्याबद्दल 746 मोटारसायकल वापरकर्त्यांना आणि 10,215 दुचाकीस्वारांना हेल्मेट नसल्याबद्दल वाहतूक पोलिसांनी दंड ठोठावला, असे ते म्हणाले. मंगळवारच्या होळी आणि शब-ए-बारातमुळे, आम्ही एक विशेष मोहीम राबवली आणि जे लोक वाहतूक नियमांचे उल्लंघन करताना आढळले त्यांना दंड केला, असे अधिकारी पुढे म्हणाले.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)