Mumbai Rain Predictions: सध्या उन्हाची काहिली अनुभवत असलेल्या मुंबईकरांसाठी काही काळ दिलासा मिळणार आहे. मुंबईमध्ये या विकेंडला पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे. अहवालानुसार 11-14 मे या कालावधीमध्ये मुंबईमध्ये पाऊस होऊ शकतो. मुंबई आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर परिस्थिती मध्यम पावसासाठी अधिक अनुकूल दिसत आहे. ताज्या अंदाजानुसार, मुंबई उपनगरांच्या तुलनेत दक्षिण मुंबईमध्ये अधिक पाऊस होईल, तर एमएमआरच्या (MMR) च्या दक्षिण आणि पूर्व भागात उर्वरित एमएमआरपेक्षा जास्त पाऊस पडेल. मुंबई किनारपट्टीवरही पावसाची शक्यता आहे. दुसरीकडे पुणे, घाट आणि दक्षिण महाराष्ट्रातही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. (हेही वाचा: Avoid Eating Street Foods: 'उन्हाळ्यात रस्त्यावरील खाद्यपदार्थ खाणे टाळा'; मुंबईत अन्नातून विषबाधा झाल्याच्या दोन घटनांनंतर BMC चे नागरिकांना आवाहन)
पहा पोस्ट-
Pune & Southern Maharashtra to experience intense thunderstorms more in ghats as the intensity looks high now. Weekend is going to be very rainy here. pic.twitter.com/Gq6BRj3uMi
— Mumbai Rains (@rushikesh_agre_) May 9, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)