Mumbai News: मुंबई सत्र न्यायालयाने रविवारी, २४ मार्च रोजी भारतीय नौदलाच्या (Indian Navy) आयएनएस कोलकाता (INS Kolkata) याने पकडलेल्या पस्तीस सोमाली चाच्यांना दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सोमाली चाच्यांना शनिवारी मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी, भारतीय नौदलाने डिसेंबरपासून सोमाली चाच्यांच्या ताब्यात असलेल्या एमव्ही रुएनवर चाचेगिरीचा प्रयत्न यशस्वीपणे हाणून पाडला होता. त्यांनी 17 क्रू सदस्यांना सुरक्षितपणे बाहेर काढले आणि 35 समुद्री चाच्यांना आत्मसमर्पण करण्यास भाग पाडले. (हेही वाचा :Mumbai Water Cut Update: मुंबईमध्ये आज 24 तासांसाठी 15% पाणी कपात )

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)