आदित्य ठाकरेमहाराष्ट्राचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सोमवारी सांगितले की, महाविकास आघाडी (MVA) नेतृत्वाखालील राज्य सरकार 2026 पर्यंत 10,000 इलेक्ट्रिक बसेसची योजना आखत आहे. ते म्हणाले, ‘आता पेट्रोल, डिझेल परवडत नसल्यामुळे आम्ही इलेक्ट्रिक बसेसकडे वळत आहोत. 2026 पर्यंत 10,000 इलेक्ट्रिक बसेस तयार करण्याचा आमचा विचार आहे.’ आज मुंबईतील बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (BEST) कार्यक्रमाला संबोधित करताना त्यांनी ही माहिती दिली.

आज मुंबई महानगरपालिकेचा बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम–बेस्टच्या ‘नॅशनल कॉमन मोबॅलिटी कार्ड’- एनसीएमसीचे लोकार्पण मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले, ‘बेस्ट हा उपक्रम नावाप्रमाणे बेस्ट आहे. परिवहन आणि वीजेचा पुरवठा ही सर्व कामे बेस्ट उत्कृष्टरित्या करत आहे. सात लाख वीज ग्राहकांना ई-बिल्स दिली जात आहेत. शहरातील ४५० मार्गांवर बेस्ट धावते, हे कौतुकास्पद आहे. त्याबाबत लंडनच्या महापौरांनीही कौतुक केले आहे. हरित थांबे, सौर ऊर्जा छतांचे थांबे असे मेड इन मुंबई असे उपक्रम आम्ही राबवत आहोत. मुंबईतील नागरिक आणि येथे येणाऱ्या पर्यटकांना उत्कृष्ट सुविधा आणि सेवा देण्याचा प्रयत्न आहे. यासाठी बेस्टच्या ताफ्यात ई बसेसची संख्या वाढविण्यात येत आहे.’

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)