Mumbai Local Train Update: मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. ठाण्यातील सर्व मार्गांवर सिग्नल बिघाडामुळे, कल्याण ते कुर्ला दरम्यानची सेवा प्रभावित झाली आहे. सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे अनेक लोकल गाड्या ट्रॅकवर थांबून राहिल्या. यामुळे अनेक गाड्या विलंबाने धावत आहेत. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कामावर जाताना हा त्रास सहन करायला लागण्याने प्रवाशांचा मनःस्ताप दिसून येत आहे. रेल्वेचे कामकाज पूर्वपदावर आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याचे मध्य रेल्वेने सांगितले आहे.

पहा पोस्ट- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)