मुंबई मध्ये आज पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान जोरदार पाऊस आणि सोबत भरती मुळे समुद्राला येणारं उधाण यामुळे अनर्थ घडू शकतो. त्यामुळे आज पर्यटक, मुंबईकरांना दुपारी 2.33 ला भरतीच्या वेळेत समुद्र किनार्यापासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भरतीच्या वेळेस 4.31 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याचा अंदाज आहे. दरम्यान आज मुंबई आणि आजुबाजूच्या भागातील शाळा देखील बंद ठेवण्यात आल्या आहेत. सकाळपासून पावसाने विश्रांती घेतल्याने सध्या वाहतूक सुरळीत आहे.
मुंबई मध्ये आज भरतीची वेळ काय?
🌊 आज समुद्राला भरती येण्याची वेळ
दुपारी २:३३ वाजता
🚫भरतीच्या वेळेत समुद्रकिनारी जाऊ नका...
🛑 सतर्क राहा, सुरक्षित राहा..!#MyBMCUpdate #HighTide@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeak@dvkesarkar@MPLodha pic.twitter.com/3wvdiUTCN3
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) July 9, 2024
🗓️ ०९ जुलै २०२४
⛈️☔ मुंबई शहर व उपनगरात आकाश अंशतः ढगाळ राहून अधूनमधून पावसाच्या मध्यम ते तीव्र सरी कोसळण्याची शक्यता आहे.
🌊 भरती - दुपारी - ०२:३३ वाजता - ४.३१ मीटर
ओहोटी - रात्री - ०८:३६ वाजता - १.६३ मीटर
🌊 भरती - (उद्या - दि.१०.०७.२०२४) मध्यरात्री - ०२:१९ वाजता -…
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) July 9, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)