Mumbai Dust Strom: आज मुंबई, ठाणेसह परिसरात हलका ते मध्यम तसेच काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि गारपीट यांसह पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. त्यानुसार आज दुपारी मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झाली. यावेळी जोरदार वादळासह धुळीचे वादळ वाहू लागले. धुळीचे वादळ आणि पावसामुळे अनेक भागात दृश्यमानता लक्षणीयरीत्या कमी झाली होती. धुळीच्या वादळाचे अनेक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. यानंतर हवामान खात्यानेही सतर्कतेचा इशारा दिला आहे. सोमवारी मुंबईत सोसाट्याचा वारा सुटला. यामुळे रस्त्यावरील धूळ हवेत उडून सगळीकडे धुळच धूळ दिसत होती. ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाटासह, वादळी वारे, धुळीचे लोट, पावसाच्या सारी यामुळे अनेक नागरिकांची तारांबळ उडाली. (हेही वाचा: Thane Rain: बदलापूरमध्ये वादळी वाऱ्यासह बरसला अवकाळी पाऊस; नेटिझन्सनी कॅमेऱ्यात कैद केले खास क्षण)

पहा पोस्ट-

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)