मुंबईतील नौदल डॉकयार्ड येथे मंगळवारी एक अपघात झाला, ज्यात नौदलाच्या तीन जवानांना आपला जीव गमवावा लागला. आयएनएस रणवीरच्या आतल्या डब्यात स्फोट झाला. या स्फोटात नौसेनेच्या तीन जवानांचा मृत्यू झाला असून, 11 जवान जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेनंतर जहाजाच्या कर्मचाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे. जखमी जवानांवर नौदल रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जखमी जवानांना कुलाबा नेव्ही नगरच्या INHS अश्विनी येथे पाठवण्यात आले आहे. आयएनएस रणवीर पूर्व नौदल कमांडकडून क्रॉस कोस्ट ऑपरेशनल तैनातीवर होती आणि लवकरच बेस पोर्टवर परत येणार होते. आयएनएस रणवीरमध्ये हा स्फोट कशामुळे झाला याबाबत नौदलाकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. भारतीय नौदलाने या स्फोटाच्या चौकशीसाठी एक समिती स्थापन केली असून, ही समिती हा स्फोट कसा झाला याची चौकशी करेल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)