मुंबईतील हवेची गुणवत्ता पाठिमागील काही दिवसांमध्ये कमालीची खालावली होती. आता त्यात हळूहळू सुधारणा होऊ लागली आहे. अर्थात ही सुधारणा अगदीच संथ आणि नाममात्र आहे. SAFAR-इंडियाने दिलेल्या माहितीनुसार मुंबईतील हेवची गुणवत्ता सध्या 'मध्यम' श्रेणीत आहे. ज्याची AQI नोंद 120 इतकी आहे. मुंबईतील हवेची गुणवत्ता चांगली राहावी यासाठी बीएमसीकडून पाठिमागील काही दिवसांपासून विविध प्रयत्न केले जात आहेत. या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून पालिकेने काही मार्गदर्शक तत्वेही जारी केली आहेत. ज्यामध्ये बांधकामाधीन असलेल्या इमारतींना कापडांनी अच्छादन करणे, सार्वजनिक आणि खासगी बांधकामे सुरु असतील तर त्या ठिकाणी धूळ उडणार नाही याची प्रामुख्याने काळजी घेणे यांसारख्या गोष्टी अंतर्भूत आहेत.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)