मुंबई विमानतळावरील दोन धावपट्ट्या येत्या 17 ऑक्टोबर रोजी देखभालीच्या कामांसाठी सहा तासांसाठी बंद राहणार असून, या कालावधीत कोणतीही विमानसेवा होणार नाही. दोन्ही धावपट्टीच्या देखभालीचे काम सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत केले जाईल, असे विमानतळ ऑपरेटरने शुक्रवारी एका निवेदनात म्हटले आहे. याबाबतची नोटीस 6 महिन्यांपूर्वीच एअरलाइन्स आणि इतर भागधारकांना जारी करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पावसाळ्यानंतरच्या सर्वसमावेशक धावपट्टी देखभाल योजनेचा एक भाग म्हणून, दोन्ही धावपट्ट्या- RWY 09/27 आणि RWY 14/32 तात्पुरत्या स्वरूपात कार्यरत नसतील.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)