मुंबई विमानतळावर गुरुवारी दुपारी एक खाजगी चार्टर्ड विमान घसरले आणि क्रॅश झाले. यामुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली. विमानात 6 प्रवासी आणि 2 क्रू मेंबर्स होते. सध्या मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. या अपघातामुळे इतर विमानांचे टेकऑफ आणि लँडिंग थांबवण्यात आले आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) सांगितले की, विशाखापट्टणमहून आलेले VSR Ventures Learjet 45 विमान मुंबई विमानतळाच्या धावपट्टी 27 वर लँडिंग करताना घसरले. यादरम्यान मुसळधार पाऊस पडत होता. त्यामुळे दृश्यमानता केवळ 700 मीटर होती. त्यामुळेच हा अपघात झाला. कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे डीजीसीएने म्हटले आहे.

(हेही वाचा: SpiceJet च्या विमानात को पायलट कडून मराठीत सूचना; सोशल मीडीयामध्ये व्हिडिओ वायरल)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)