MoU Between WEF and MMR: मुंबई महानगर प्रदेशला (MMR) 'जागतिक आर्थिक केंद्र' म्हणून विकसित करण्याबाबत निती आयोगाच्या अहवालाचे आज सह्याद्री अतिथीगृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रकाशन करण्यात आले. यावेळी मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण- एमएमआरडीए व वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम यांच्या एमएमआर वर्ल्ड ईकॉनॉमी हबसाठीच्या सामंजस्य करार करण्यात आला. या करारावर एमएमआरडीएचे महानगर आयुक्त विक्रमकुमार तसेच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे संस्थापक तथा कार्यकारी अध्यक्ष क्लॉस श्वाब यांनी स्वाक्षरी केल्या व करारांचे अदान-प्रदान केले.
या सामंजस्य करारामुळे मुंबईचे जागतिक आर्थिक केंद्राचे स्वप्न दृष्टीपथात आले आहे. यातून आगामी काळात मुंबईचा जीडीपी– सकल उत्पन्न दुप्पट होईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ते म्हनालोये आम्ही आमचे 1 ट्रिलियन डॉलरचे उद्दिष्ट 2027 पर्यंत पार करू. तर निती आयोगाने महाराष्ट्राच्या एक लाख कोटी डॉलर्स – वन ट्रिलियन डॉलर्स ईकॉनॉमीच्या दिशेने टाकलेल्या पावलांना बळ दिले आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी सांगितले. सीएम एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, ‘मुंबई ही आम्हा सर्वांसाठीच जीवनवाहीनी आहे. हा एक महत्वपूर्ण क्षण आहे. मुंबई बदलली तर महाराष्ट्र आणि देशासाठीही महत्वाचा बदल होणार आहेत. आम्ही राज्याच्या विकासासाठी स्थापन केलेल्या आर्थिक सल्लागार परिषदेने राज्याच्या विकासासाठी शिफारस आणि आराखडा सादर केला आहे. या आराखड्याला बळ मिळेल अशी संकल्पना घेऊन निती आयोग पुढे आला आहे. सात बेटांवरील मुंबईचा विकास आता एमएमआर आर्थिक केंद्र होण्यासाठी सात महत्वाच्या शिफारशी निती आयोगाने केल्या आहेत. मुंबई ही भविष्यात ग्लोबल फिनटेक कॅपिटल होईल.’ (हेही वाचा: ST Mahamandal Profit: तब्बल 9 वर्षानंतर प्रथमच एसटी महामंडळाला यंदाच्या ऑगस्टमध्ये 16 कोटींपेक्षा जास्त नफा; जाणून घ्या कोणत्या गोष्टींचा झाला फायदा)
एमएमआरडीए व वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम यांच्यात ईकॉनॉमी हबसाठी सामंजस्य करार-
#WATCH | Maharashtra CM Eknath Shinde says, "MMR is being developed as a growth hub and today economic master plan was launched...We will cross our 1 trillion dollar goal by 2027...Maharashtra is a big contributor to the GDP..." pic.twitter.com/Ccxka10ayB
— ANI (@ANI) September 12, 2024
मुंबई महानगर प्रदेश (एम.एम.आर.) ला 'जागतिक आर्थिक केंद्र' म्हणून विकसित करण्याबाबत #निती आयोगाच्या अहवालाचे आज सह्याद्री अतिथीगृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रकाशन करण्यात आले. तसेच मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण- एमएमआरडीए व वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम यांच्या एमएमआर वर्ल्ड… pic.twitter.com/2tTQNdJXw5
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) September 12, 2024
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आणि मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण- एमएमआरडीए यांच्यातील सामंजस्य करारामुळे मुंबईचे जागतिक आर्थिक केंद्राचे स्वप्न दृष्टीपथात आले आहे. यातून आगामी काळात मुंबईचा जीडीपी - सकल उत्पन्न दुप्पट होईल असे मत यावेळी बोलताना व्यक्त केले. तर निती आयोगाने… https://t.co/stiqfLa5IL pic.twitter.com/m2kpnYgUJw
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) September 12, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)