साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, श्रेष्ठ साहित्यिक कुसुमाग्रज तथा वि. वा.शिरवाडकर यांनी मराठी साहित्य क्षेत्रात आपल्या लेखणीने विशेष स्थान प्राप्त केले. त्यांचा जन्मदिन, 27 फेब्रुवारी हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रभर ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषा ही ज्ञानभाषा व्हावी यासाठी कुसुमाग्रजांनी मोलाचे प्रयत्न केले. त्यामुळे त्यांच्या जयंतीनिमित्त 2013 पासून हा दिवस साजरा केला जातो. मराठी भाषेला सर्वप्रथम 1965 मध्ये राजभाषेचा दर्जा देऊन, तिच्या समृद्धीसाठी विशेष उपाययोजना करणारे महानायक वसंतराव नाईक यांच्याही ऐतिहासिक योगदानाचे या निमित्ताने स्मरण केले जाते. मराठी भाषेचा इतिहास खूप आधीपासून म्हणजेच अगदी राष्ट्रकुट राजापासून अस्तित्वात आहे. प्र. के. अत्रे, पु. ल. देशपांडे, चिं. वि. जोशी, ग. दि. माडगूळकर, वि. स. खांडेकर, ना. सि. फडके, साने गुरुजी यांच्या सारख्या साहित्यिकांनी मराठीत आपल्या साहित्याची भर घालून मराठी भाषा मराठी माणसाच्या मनामनात जागृत ठेवण्याचे कार्य केले. मराठी भाषा गौरवदिनाचे निमित्त साधत राज्यभर विविध कार्यक्रम, पुरस्कार सोहळे, कवी संमेलनांचे आयोजन केले जाते. आजच्या या दिनाचे औचित्य साधत अनेकांनी मराठी भाषा गौरव दिना’च्या शुभेच्छा दिल्या आहेत. (हेही वाचा: Marathi Bhasha Gaurav Din 2025: मराठी भाषा गौरव दिन आणि मराठी राजभाषा दिन मध्ये फरक काय? जाणून घ्या मराठी बांधवांसाठी 27 फेब्रुबारी का महत्त्वाचा)
मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! #मराठी #मराठीभाषा #मायमराठी #मराठीगौरवदिन#मराठीराजभाषादिन #MyBMCUpdates pic.twitter.com/p8hCFpOnUI
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) February 27, 2025
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर साजरा होणारा हा पहिला मराठी भाषा गौरव दिन!
हा दिवस आपल्या भाषेच्या श्रीमंतीचा सन्मान करण्याचा आणि तिच्या जतन व संवर्धनाचा संकल्प करण्याचा आहे.
मोदी सरकार आणि राज्यातील भाजपा महायुती सरकार मराठी भाषेच्या उन्नतीसाठी सातत्याने प्रयत्नशील… pic.twitter.com/LOPPcrI7fG
— Yogesh Tilekar (@iYogeshTilekar) February 27, 2025
महान साहित्यिक वि. वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांचा आज जन्मदिन. हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणूनही साजरा केला जातो. यानिमित्ताने या ज्ञानपीठ विजेत्या महान साहित्यिकास वंदन.
माझ्या मराठी मातीचा,
लावा ललाटास टिळा,
हिच्या संगाने जागल्या,
दऱ्याखोऱ्यांतील शिळा.
हिच्या कुशीत… pic.twitter.com/jXjyU8JPOp
— Supriya Sule (@supriya_sule) February 27, 2025
ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज उर्फ विष्णू वामन शिरवाडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
मराठी भाषा गौरव दिन निमित्त सर्व मराठी भाषिकांना मनःपूर्वक शुभेच्छा! pic.twitter.com/f3M16Hvulj
— Dr. Sujay Vikhe Patil (@drsujayvikhe) February 27, 2025
महायुती सरकार काळात आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर आलेला हा पहिला मराठी भाषा गौरव दिन !
सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! #मराठी_भाषा_गौरव_दिन #MarathiBhashaGauravDin #MarathiLanguageDay #Marathi pic.twitter.com/nvnqjgI47q
— Nitesh Rane (@NiteshNRane) February 27, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)