सोमवारी मुंबईत मराठा आरक्षणाबाबत झालेल्या बैठकीनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी जालना जिल्ह्यातील मराठा आरक्षण आंदोलकांवर केलेल्या लाठीचार्जबद्दल राज्य सरकारला खेद वाटतो असे सांगितले. ते म्हणाले, ‘पोलिसांनी केलेला लाठीचार्ज योग्य नव्हता. मी सरकारच्या वतीने माफी मागतो. याला जे जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.’ जालना पोलिसांना लाठीचार्ज करण्याचे आदेश कोणत्याही उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिले नसल्याचेही फडणवीस यांनी सांगितले. असे निर्णय (पोलीस बळाचा वापर इ.) स्थानिक पातळीवर घेतले जातात, असेही ते म्हणाले. (हेही वाचा: Ajit Pawar On Jalna Lathi Charge: सरकारने जालना मध्ये लाठीचार्जचे आदेश दिल्याचं सिद्ध केल्यास राजकारणापासून दूर होईन; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विरोधकांना आव्हान)
Mumbai: "Lathicharge by Police was not right... I am apologising on behalf of the Government. CM has said that the action will be taken against those who are responsible for it," says Maharashtra Dy CM Devendra Fadnavis at the Maratha Reservation meeting chaired by CM. pic.twitter.com/777PApSgLm
— ANI (@ANI) September 4, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)